जागरूकता आहे, सजगता नाही
शहरे, गावे आणि आपल्या भवितव्याचे पर्यावरण नावात उरलेला निसर्ग धुळ्यापासून चाळीसेक किलोमीटरवर लामकानी नावाचे एक गाव आहे. नाव पहिल्यांदा ऐकताना गमतीदार वाटते. पण स्थानिक लोक सांगतात, की पूर्वी कुरणांनी व्यापलेल्या या भागात लांब कानांचे ससे मोठ्या संख्येने होते. म्हणून – लामकानी. ससे आजही आहेत. भारतीय ससा – काळ्या मानेचा ससा (Lepus nigricollis) – हा तसा …